शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये अभिनेता अमित साध जावयाच्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ‘तुम्हारी सुलू’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटामधून झळकल्यानंतर आता ती पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या समोर येणार आहे. सध्या अभिनेत्री विद्या बालन ‘शकुंतला देवी-ह्यूमन कंप्यूटर’ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात विद्या बालनच्या पतीची भूमिका अभिनेता जीशु सेनगुप्ता साकारणार आहे.
image.png
गणिततज्ज्ञ अशी ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री विद्या बालन या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर आता या चित्रपटामध्ये अभिनेता अमित साधही दिसणार आहे. गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जावयाची भूमिका अभिनेता अमित साध साकारणार आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री सान्या मल्होत्रा दिसणार आहे.

https://twitter.com/TheAmitSadh/status/1192807408474550272

एका मुलाखतीमध्ये अमित साध म्हणाला की, ‘चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला शकुतला देवी यांच्या आयुष्याबद्दल बरीच माहिती मिळाली. शकुंतला देवींचा जावई अजयच्या पात्राला मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. याव्यतिरिक्त मी विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्यासाठी देखील खुप उत्सुक आहे.’

https://www.instagram.com/p/Bm0PB2Chhh8/

अमित चित्रपटाची दिग्दर्शिका अनू मेननबद्दल बोलताना म्हणाला की, ‘मी अनेक दिवसांपासून अनुबरोबर काम करत आहे. ती ज्या पद्धतीने काम करते त्याबद्दल मला तिचा खूप आदर वाटतो. तिच्या दिग्दर्शन आणि कथा सांगण्याच्या पद्धतीमुळे मला माझी भूमिका सापडायला खूप मदत होते. तिने मला अजयची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी योग्य दिशा दिली आहे. ‘

दिग्दर्शिका अनू मेनन म्हणाली की, ‘शकुंतला आणि त्यांची मुलगी अनु या दोघींच्या आयुष्यावर एक महत्वाची व्यक्ती म्हणजे अजय. अमित हा अजयच्या भूमिकेसाठी योग्य आहे. अमित, विद्या आणि सान्या हे तिघे मोठ्या पडद्यावर चांगली कामगिरी दाखवेल असा मला विश्वास आहे. ‘

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !