अमित शहा यांचे ते विधान शिवसेनेसाठी नव्हते : भाजपची सारवासारव 

सांगली :पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूर दौऱ्यावर आले असता “जे आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढू आणि जे सोबत येणार नाहीत त्यांना हि निवडणुकीत पटकवू” असे म्हणले होते ते वक्तव्य शिवसेनेला उद्देशून बोललेच नव्हते असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. दानवे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला आहे.

राज्यात शिवसेने सोबत युतीची बोलणी सुरु असून हातकणंगले मतदारसंघात गतवेळी आमच्या कडून राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या वेळी आमचा मित्रपक्ष शिवसेना हि जागा लढवेल असे रावसाहेब दानवे यांनी म्हणले आहे.

मी आणि भाजपचे संघटन मंत्री आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती ठरवण्यासाठी राज्यभर दौरे करत आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही बूथ स्तरावरून निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. केंद्र आणि राज्याच्या सरकारने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. मुंबईत कोस्टल रोड, मुंबई, पुण्यात विमानतळ, मेट्रो रेल्वे, राज्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे आमच्या सरकारनी केली आहेत. शेतकरी कर्जमाफी, मागेल त्याला शेततळे, रासायनिक खतांना अनुदान इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने राज्यातील जनते मध्ये समाधान आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्याच्या विधानसभेत स्थानिक प्रश्नामुळे भाजपचा पराभव झाला आहे. या निकालाचा लोकसभेच्या निकालावर कसलाही परिणाम होणार नसून केंद्रात पुन्हा भाजपचं सत्ता रूढ होणार आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहित आहे कि आपण पुढील ५० वर्षे सत्तेत येणार नाही म्हणून त्यांची आघाडी करण्यासाठी धरपडत सुरु आहे अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

जयंत पाटील भाजपात आले तर त्यांना हि पक्षात घेऊ
चंद्रकांत पाटील हे दिसेल त्याला पक्षात घेत आहेत अशी टीका जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्या संदर्भात प्रश्न विचारला असताना रावसाहेब दानवे म्हणाले कि , जयंत पाटील हे चांगले नेते आहेत. ते जर भाजपात आले तर आम्ही त्यांना हि भाजपात घेऊ असा टोला रावसाहेब दानवे यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.