पंतप्रधान मोदींचा बायोपिक ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित,

अमित शाहांच्या हस्ते होणार पोस्टरचं अनावरण

मुंबई : वृत्तसंस्था – निवडणुकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. विविध राजकीय नेत्यांवर बायोपिक बनत आहेत. अशातच सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मोदींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे . या पोस्टरचे अनावरण भाजपा अध्यक्ष अमित शहा करणार आहेत. २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ पहिला चित्रपट ठरणार आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. ओमांग कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’, ‘भूमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बायोपिकनंतर आता पंतप्रधानपदी मोदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकनंतर आता त्यांच्या आयुष्यावर वेबसीरीजचीही बनवली जाणार आहे. इरॉस नाऊ’नं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासावर ‘मोदी’ ही दहा भागांची वेबसीरीज प्रदर्शित करणार आहे. ‘ओह. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या वेबसीरीजमधून उलगडला जाणार आहे.माय गॉड’ ‘१०२नॉट आऊट’चे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. येत्या एप्रिलमध्ये ही वेबसीरीज ‘इरॉस नाऊ’वर प्रदर्शित केली जाणार आहे. गुजरातमध्ये या वेब सीरीजचं शूटिंग पार पडलं आहे.