अमित शहा ‘या’ दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा नियोजित सांगली, सातारा, कोल्हापूर दौरा होणार होता. परंतु स्वाईन फ्लूने आजारी असणाऱ्या अमित शहा यांना अधिक विश्रांतीची गरज भासल्याने त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला होता. याशिवाय त्यांचे हे दैरे रद्द झाल्याने २४ जानेवारीला पदाधिकारी मेळावा होणार होता यालाही ते उपस्थित राहू  शकणार नव्हते.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात अमित शहा सांगली येथे चार लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. असेही समजत आहे. यापूर्वी शहा स्वाइन फ्लूने आजारी पडल्याने त्यांचा सांगली व सोलापूर दौरा रद्द झाला होता.

अमित शहा २८ फेब्रुवारीला करणार असणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाई आणि सांगलीच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. मुख्य म्हणजे आचार संहिता सुरू होण्यापूर्वी त्यांचा दौरा होणार आहे. सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघ हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील आढावा ते घेणार असल्याची शक्यता आहे.