Amitabh Bachchan | ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा भीषण अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कौन बनेगा करोडपती 14 च्या (Kaun Banega Crorepati 14) सेटवर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा भीषण अपघात (Accident) झाला झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या डाव्या पायाची नस चुकून कापली (Leg Vein Cut) गेली. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या पायावर टाके घालण्यात आले आहेत. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीच माहिती दिली आहे. (Amitabh Bachchan Cut His Vein in Left Calf)

 

अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांच्या पायातून सतत रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनी रक्तप्रवाह नियंत्रित करुन ज्याठिकाणी नस कापली गेली आहे तिथे टाके (Stitches) घातले आहेत. त्यांनी ही घटना कधी आणि कशी घडली याची संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर दिली आहे. (Amitabh Bachchan Accident News)

 

ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, बुटामध्ये असलेल्या एका धातूच्या तुकड्यामुळे माझ्या डाव्या पायाची नस कापली.
तिथे कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला.
त्यावेळी कर्मचारी व वैद्यकीय पथकाने मला मदत केली.
वेळेवर उपचार मिळाल्याने माझी ट्रीटमेंट झाली आहे, तरी काही टाके पडले आहेत.

 

Web Title :- amitabh bachchan cut his vein in left calf on the sets of
kaun banega crorepati 14 check health update marathi news today Big B News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा