Uddhav Thackeray | …याची जबाबदारी घेऊन आज शेतकर्‍यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात यापूर्वीच्या पावसाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे (Rain in Maharashtra) अतोनात नुकसान केले आहे. ऐन दिवाळीत आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) ओला दुष्काळ जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अशावेळी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आजपासून मराठवाडा दौर्‍यावर आहेत. यामुळे भाजपा (BJP)-शिंदे गटाची कोंडी झाली आहे. या मराठवाडा दौर्‍याच्या निमित्ताने भाजपाने ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या भेटीसाठी आजपासून मराठवाडा दौर्‍यावर आहेत. यावरून नाशाणा साधताना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, उध्दव ठाकरे हे आज मराठवाडा दौर्‍यावर शेतकर्‍यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या.

 

उपाध्ये यांनी म्हटले की, चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या 8 कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?

वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या (NDRF) धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल, अशी घोषणा आपण गेल्या वर्षी 25 जुलै रोजी केली होती. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुढील वर्षभरात ही घोषणा कोणत्या बासनात बांधली?

केशव उपाध्ये यांनी प्रश्न विचारला की, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याची गरज होती तेव्हा मुख्यमंत्री असूनही तुम्ही पुलावर अंथरलेल्या रेड कार्पेटवर उभे राहून मदतीची केवळ आश्वासने दिलीत. तेव्हा संकटात खचलेला शेतकरी पुढे वर्षभरात सावरावा यासाठी तुमच्या सरकारने काय केले?

 

शेतकर्‍यांना वरदान ठरलेली जलयुक्त शिवार (Jalyukta Shiwar) ही शेततळी योजना बंद करून शेतकर्‍याचे
पाणी तोडल्यावर तुम्ही 4 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्याची घोषणा केली होती.
पुढच्या दीड वर्षात या घोषणेचे कागदी घोडे कोणत्या बासनात बांधले?

जिरायत, बागायत जमिनीसाठी 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे.
त्यामुळे आम्ही ती दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 10 हजार रुपये देणार,
फळपिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत) मदत करण्यात येईल.
असे 23 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केले होते. दोन वर्षांनंतरही अनेक शेतकर्‍यांना ही मदत मिळालीच नाही.
याची जबाबदारी घेऊन आज शेतकर्‍यांसमोर माफी मागणार का? असा प्रश्ना उपाध्ये यांनी विचारला आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | bjp criticizes uddhav thackerays visit to marathwada

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Politics | शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट! शिंदे गटातील 22 नाराज आमदार भाजपात विलीन होणार