‘त्या’ रात्री झालं ‘असं’ काही की, अभिनेत्री रेखा ‘बिग बी’ अमिताभ यांच्या जीवनातून कायमच्या दूर गेल्या !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करतात. आपल्या अभिनयासोबत बिग बी आपल्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिले आहेत. आज त्यांच्या आयुष्यातील अनेकांना माहिती नसणारा किस्सा आपण जाणून घेणार आहोत. 70 च्या दशकातील अभिनेत्री रेखा आणि बिग यांची लव्ह स्टोरी सर्वांना माहितीच आहे. एका रात्रीनंतर मात्र रेखा अमिताभ यांच्या आयुष्यातून गायबच झाल्या. त्या रात्री असं काय घडलं होतं ?

'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

70 च्या दशकातील हा काळ होता. 1977 सालचा. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याची खूपच चर्चा सुरू होती. जया यांनी यावर कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही. त्या फक्त आपल्या काम करत होत्या. त्याकाळी रेखा भांगात सिंदूर लावून गर्भवती आहेत अशा चर्चा मीडियात पसरवून अमिताभ यांच्या सोबत नातं जगजाहीर करण्याच्या तयारीत होत्या. जया बच्चन मात्र आपला तुटत चाललेला संसार सावरायच्या प्रयत्नात होत्या.
रेखांना जयांनी दिलं जेवणासाठी दिलं निमंत्रण
बिग बी एकदा शुटींगसाठी मुंबईच्या बाहेर गेले. त्या दिवशी जया यांनी रेखांना फोन केला. रेखांना त्यांनी जेवणासाठी निमंत्रण दिलं. रात्री रेखा तयार होऊन जया यांच्या घरी पोहोचल्या. रेखा यांना वाटलं की, जया आपला अपमान करतील. खूप काही ऐकवतील. कदाचित दोघांमध्ये हाणामारी होईल. परंतु जय यांनी मात्र असं काहीही केलं नाही. जया अगदी साध्या कपड्यात होत्या.

‘काहीही झालं तरी मी अमितला सोडणार नाही’
जयांनी रेखांचं स्वागत केलं. दोघींनी सोबत जेवण केलं. खूप साऱ्या गप्पा मारल्या. जया यांनी रेखा यांना सूंपूर्ण घर, गार्डन दाखवलं त्यांचा आदर सत्कार केला. डिनर झाल्यानंतर रेखा जायला निघाल्या तेव्हा जया यांनी निरोप देताना रेखाला जे काही बोलल्या ते ऐकून रेखा हादरल्याच. जया म्हणाल्या, “काहीही झालं तरी मी अमितला सोडणार नाही.”

रेखा यांनी अमिताभ यांच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेतला
यानंतर रेखा यांनी अमिताभ यांच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेतला. याच्या दुसऱ्या दिवशी अनेक चर्चा सुरू झाल्या. उलट सुलट बातम्याही छापल्या गेल्या. या एका रात्रीनंतर अमिताभ यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेल. याविषयी नंतर जया आणि रेखा यांच्यापैकी कोणीच काही बोललं नाही. रेखा यांना कळून चुकलं होतं की, जया यांना अफेअरबद्दल माहिती असलं तरीही त्या कुटुंब वाचवण्यासाठी तोंडातून शब्दही काढणार नाहीत.

visit : policenama.com