‘बिग बी’ अमिताभचा जावई त्यांच्यापेक्षाही ‘श्रीमंत’, संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल ‘थक्क’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 50 वर्षांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. जवळपास त्यांची 2800 कोटींची संपत्ती आहे. आजही बिग बी अविरत काम करत आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, बिग बींपेक्षा त्यांचा जावई जास्त श्रीमंत आहे. अनेकांना हे कदाचित माहिती नसेल. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

बिग बींची मुलगी श्वेता हिनं निखिल नंदासोबत लग्न केलं आहे. निखिल एक यशस्वी उद्योगपती आहे. निखिलची आई रितू नंदा या बॉलिवूडमधील लोक्रपिय अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांची लेक आहे. रितू नंदा आणि राजन नंदा यांचा मुलगा निखिल आहे. 16 फेब्रुवारी 1997 रोजी श्वेता आणि निखिल नंदा यांचा विवाह झाला.

निखिल एस्कॉर्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 2013 साली ते या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर बनले आहेत. 1997 पासूनतचे ते निर्देशक मंडळाचे सदस्य आहेत. अमेरिकेतील व्हॉर्टन बिजनेस स्कुलमधून त्यांनी बिजनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे. निखिल हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उद्योगपती आहेत. रिपोर्ट्सनुसार, निखिल नंदा यांची जवळपास 3500 कोटींची संपत्ती आहे. जी बिग बींच्या संपत्ती पेक्षाही जास्त आहे. अनेक मोठ्या बिजनेसमनपैकी निखिल नंदा हे नाव घेतले जाते.

निखिल आणि श्वेता यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या दोघांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव नव्या नवेली तर मुलाचे नाव अगस्त्या आहेत. नव्या नवेली नंदा आपल्या फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

बिग बींची पत्नी जया बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांची जवळपास 1000 कोटींची मालमत्ता आहे. बिग बींचा मुलगा अभिषेक बच्चन याची जवळपास 248 कोटींची मालमत्ता आहे. अभिषेक आपल्या करिअरमध्ये खास काही कमाल दाखवू शकला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/