Amol Kolhe | डॉ. अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, म्हणाले, ‘पुढील 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक’ (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe | मालिकांच्या चित्रीकरणामुळे मतदारसंघासाठी वेळ देत नसल्याच्या विरोधकांकडून होणाऱ्या टीकेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम करण्याची घोषणा केली आहे. पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदानाच्या दोन दिवस आगोदर हा निर्णय घेऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे.(Amol Kolhe)

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे डॉ. कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. परंतु 2019 मध्ये शिरूरमधून खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर मतदारसंघात वेळ देत नसल्याची टीका सातत्याने केली जाते. चित्रीकरणात व्यस्त असल्याचे सांगत विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा केला. त्यांना याच मुद्यावरुन प्रचारात लक्ष केले. अभिनेत्याला मतदारसंघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार, त्यांना जनतेसाठी वेळ नाही. चित्रीकरणातच व्यस्त आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हे यांना लक्ष केले होते. यापार्श्वभूमीवर कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आगामी पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम केला आहे.
राजकारण हा अर्धवेळ व्यवसाय नसून पूर्णवेळ सेवा करण्याचे क्षेत्र आहे.
माझ्या शिरूर मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे.
मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर मतदार संघाचे प्रश्न सोडवणे यालाच
माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही.
काही दिवसांसाठी नाही, तर पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईल. माझी शिरुरच्या जनतेसाठी ही कमिटमेंट आहे, असे म्हणत कोल्हे यांनी पुन्हा खासदार झाल्यास आपण पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्राला रामराम करत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

Maval Lok Sabha | मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा

Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा