Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला

खेड – Amol Kolhe On Ajit Pawar | नटसम्राट (Natsamrat) म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगलेच भडकले त्यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत पलटी सम्राट आणि खोके सम्राट असा उल्लेख केला. पलटी सम्राट आणि खोके सम्राट पेक्षा कधीही नटसम्राट चांगलं असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिहल्ला केला आहे.(Amol Kolhe On Ajit Pawar)

खेड (Khed) तालुक्यातील सांडभोरवाडी – काळूस जिल्हा परिषद गटात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू होता. दरम्यान काळूस गावात बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील समाधीबाबत देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आणि पालकमंत्री अजित पवार यांना घेरलं. ते म्हणाले की एवढे वर्षे समाधी वढू बुद्रुक – तुळापूरला असताना काहीजण अनेकवर्षे खासदार होते, तुम्ही एवढे वर्षे पालकमंत्री होतात, मग मी आज तुम्हाला प्रश्न विचारतो की, तुम्ही आजपर्यंत या समधीस्थळाला एकही रुपया का दिला नाही ?

कलाकार म्हणून जी कला सादर केली, त्यामाध्यमातून माझ्या राजाचा इतिहास १५७ देशांमध्ये पोहचवला. ज्याला तुम्ही नटसम्राट म्हणून हिणवता ना, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. सगळी प्रलोभने असताना दहा – दहा वेळा इकडे ये असे फोन असताना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वाशी आणि विचारांशी प्रामाणिक राहिलो, भूमिका कोणी बदलली हे सर्वांनाच माहीत आहे. नटसम्राट आणि कार्यसम्राट असलेलं चांगलं पण पलटी सम्राट आणि खोके सम्राट यापेक्षा नटसम्राट कधीही चांगल. असा जाहीर सवाल उपस्थित करत अजित पवार यांच्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिहल्ला केला आहे.

पुढे ते बोलताना म्हणले की, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागायला येणाऱ्यांना आता प्रश्न विचारला पाहिजे की
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला कसं पंतप्रधान करायचं ?
शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार घरी बसवण्याची हीच ती वेळ आहे.
१० वर्षे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली अजूनही माती कलवायची नाही म्हणून आता हे सरकार उलथून टाकण्याची
ही वेळ आली आहे. असे म्हणत भाजपच्या केंद्र सरकार देखील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले.

यावेळी अशोक खंडेभारड, बाबाजी काळे, अतुल देशमुख, हिरामण अण्णा सातकर, सुधीर मुंगसे, अमोल पवार,
रामदास धनवटे, शिवाजीराव वर्पे, राजमाला बुट्टे, मनीषा सांडभोर, योगेश पठारे, विशाल झरेकर, वर्षा ताई सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड, सोमनाथ मुंगसे, राहुल गोरे, शामराव कड, गणेश पवळे, रोहिदास पवळे, दिगंबर लोणारी, विलास कुटे, रुरेश चव्हाण, मुचुकून जाधव, दत्ता पोटावडे, संजय कदम, दत्ता मोरे, राधताई अरगडे, नितीन दौंडकर, पवन जाचक यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट