Amol Kolhe On Ajit Pawar | …EVM मध्ये कचाकचा बटण दाबा, अजित पवारांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार; म्हणाले – ”हा आचारसंहितेचा भंग नाही का?”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Ajit Pawar | निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहेत, त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेच्या टँक्सच्या पैशाची प्रलोभने दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का? निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे. महागाई, बेरोजगारीपासून सुटका होणे गरजेचे आहे. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या पैशातला निधी देऊन या धोरणांमध्ये दुरुस्ती होत नाहीत, म्हणुन जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावले आहे. (Shirur Lok Sabha Election 2024)

इंदापूर येथे व्यापाऱ्याच्या सभेत (Indapur Sabha) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी म्हटले होते की, आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, पण मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. पवारांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुन आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांना सुनावले आहे. (Baramati Lok Sabha)

अमोल कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनता ही खूप सुज्ञ आहे.
शरद पवार ज्या हिरीरीने महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यांचा भार थोडासा का होईना हलका करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
मला मायबाप जनता फार व्यवस्थित ओळखून आहे आणि त्यामुळे मायबाप जनता माझा बालेकिल्ला ही सांभाळून ठेवणार आहे.(Amol Kolhe On Ajit Pawar)

दरम्यान, अजित पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे व्यापारी आहेत. त्यामुळे ते सौदाच करतील. हा देश सध्या व्यापारी चालवत आहे.
त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्यापाऱ्यांचे एजंट पेरले आहेत. त्यातलेच अजित पवार हे एजंट आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार…

इंदापूर येथे व्यापाऱ्याच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल.
पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका.
विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये
देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”