Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है, म्हणत, अमोल कोल्हेंनी सादर केले पुरावे; आढळराव पाटील कसा ‘डिफेन्स’ करणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले

शिरुर : Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | शिरुर लोकसभेचे (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधताना आढळराव पाटील यांनी संसदेत स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयीच विचारले होते, असा आरोप केला होता. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटीलांना कोंडीत पकडत, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं ठणकावून सांगितलं आहे.

ओतूरच्या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लक्ष करत, हे तर लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, असा थेट आरोप केला होता. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुरावे द्या, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घ्या, अस आव्हान दिले होते. (Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)

डॉ. कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारल्याच सांगत, शब्द फिरवत माघार घ्यायची नाही, अस प्रतिआव्हान आढळराव पाटलांना दिल. त्यानंतर आज त्यांनी पुरावे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. डॉ. कोल्हेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर होतोय.

आढळराव पाटलांनी लोकसभेत ७ एप्रिल २०१७ आणि १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडलेल्या प्रश्नांची कागदपत्रे अमोल कोल्हे यांनी दाखवली आहेत. आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला? असा सवाल उपस्थित करत याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं, शिवाय मी पुरावे दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडणार, हा दिलेला शब्द आता आढळरावांनी पूर्ण करावा, असे प्रती आव्हानही अमोल कोल्हेंनी दिले आहे.

तसेच हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है.
असे म्हणत १७ मार्च २०१७, ९ डिसेंबर २०१६ आणि २६ डिसेंबर २०१८
या तारखांना कंपनी हितासाठी मांडलेल्या प्रश्नांची आठवण करून दिली.
सोबत कागदपत्रांचा गठ्ठा दाखवत हे सगळे पुरावे टप्याटप्याने जनतेसमोर मांडणार असल्याचा इशारा देत,
कोल्हेनी आढळरावांचं टेन्शन वाढवलं आहे.

शिरूरसारख्या ग्रामीण मतदारसंघातल्या तत्कालीन खासदार आढळराव पाटलांनी
संरक्षण विभागाला डिफेन्स पार्टस पुरवणाऱ्या कंपनीचे प्रश्न विचारल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
आता आढळराव पाटील कसा ‘डिफेन्स’ करणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावाखेड्यातले, शेतीमातीचे प्रश्न सोडून आढळराव भलतेच प्रश्न लोकसभेत मांडत असताना
आढळून आल्याने संशयचे मळभ आणखीन गडद होतय.
आढळराव पाटील कोल्हेंच्या आरोप प्रत्यरोपामुळे शिरूरच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा तोल ढळलाय’ शरद पवारांची थेट टीका

Murlidhar Mohol | कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद,
‘मोदी… मोदी…’ जयघोष !!!

Baramati Lok Sabha | बारामतीसह 11 मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार,
तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान