Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | आढळराव पाटील आयात उमेदवार : डॉ. अमोल कोल्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | ज्या व्यक्तींच्या विरोधात गेल्या वीस वर्षांपासून विलास लांडे हे काम करत आहेत. त्याच व्यक्तीला शिरूर लोकसभेतून (Shirur Lok Sabha Election 2024) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना राष्ट्रवादीने आयात केले आहे. असे असल्यास विलास लांडे हे नाराज होणे स्वाभाविक असल्याचं मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.(Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)

कोल्हे यांनी शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या भोसरीमध्ये सुट्ट्यांचे औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला. त्यावेळी ते पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) प्रसार माध्यमांशी बोलत होते.

विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत शिरूर मतदारसंघात बघायला मिळणार आहे. यावेळी आढळराव यांचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण ऐवजी घड्याळ आहे.

अजित पवार गटातील इच्छुक विलास लांडे हे मात्र नाराज असल्याची चर्चा आहे.
याच प्रश्नावर डॉ. कोल्हे यांनी विलास लांडे हे नाराज होणे स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले.
ते म्हणाले की २०१९ ला ऐनवेळी माझ्यासाठी पक्षाने सांगितल्यानंतर माघार घेतली, माझ्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी
उभे राहिले. विलास लांडे यांचा दांडगा जनसंपर्क असून सातत्यपूर्ण काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास