अमरावतीच्या तरूणानं पुण्यातील युवतीला दिलं प्रेमाचं वचन अन् काढले अर्धनग्न फोटो, नंतर केले व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तरूणाशी मैत्री केल्यानंतर तिला प्रेमाचे वचन देऊन लग्नाच्या अमिषाने तिचे अर्धनग्न व नग्न फोटो घेऊन तिने फोन न उचलल्याने फोटो व्हायरल करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी उमेश जांम्बेकर (वय 29, रा. अमरावती) यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरूणीचा विश्वास संपादन करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाचे वचन देऊन लग्न करू असे अमिष दाखविले. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून बोलत असे. यावेळी त्याने तरूणीचे अर्धनग्न व पुर्ण नग्न फोटो काढून घेतले. काही दिवसांनी तरूणी कामात असल्याने आरोपीचा फोन उचलू शकली नाही. त्यावेळी त्याने संशय घेऊन तरुणीला हे फोटो इतरांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी दिली. तसेच, हे फोटो व्हायरलकरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार समोर आल्यानंतर तरूणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.