Amravati Love Jihad Case | नवनीत राणांनी दावा केलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटले-‘माझ्या वैयक्तिक…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी एका मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा (Amravati Love Jihad Case) आरोप करत सोनपेठ पोलीस ठाण्यात (Sonpeth Police Station) काल राडा घातला होता. मुलीला आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली होती. तसेच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत मुलीचा शोध घेतला. मात्र आता मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून या प्रकरणाने (Amravati Love Jihad Case) नवे वळण घेतले आहे. पोलिसांनी घेतलेल्या जबाबात मुलीने सांगितले की, काही कारणांनी कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचे सांगितले. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Amravati CP Aarti Singh) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मलीचा जबाब वाचून दाखवला.

 

राजापेठ पोलीस ठाण्याच्या (Rajapeth Police Station) हद्दीतील 19 वर्षीय वयाची मुलगी मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही तरुणीचा शोध सुरू केला. याच दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात येऊन राडा घातला. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील (Amravati Love Jihad Case) मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे (Manish Thackeray) यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. त्याचा जाब विचारण्यासाठी आलो असल्याचे राणा म्हणाल्या. यावेळी पोलीस आणि राणा यांच्या वाद झाले.

 

दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्याचे सांगून घरातून बेपत्ता झालेली तरुणी बुधवारी रात्री साताऱ्यात सापडली. पुणे जीआरपी (Pune GRP) आणि सातारा पोलिसांनी (Satara Police) मुलीला गोवा एक्सप्रेसमधून (Goa Express) ताब्यात घेतले. लव्ह जिहादसाठी या तरुणीचे अपहरण (Kidnapping) करण्यात आलं होतं, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केला होता. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावेळी काही करणांनी रागाच्या भरात मी घर सोडलं, असं तरुणीने पोलिसांना सांगितले. तशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

 

मुलीच्या शोधासाठी रेल्वे थांबवली

अमरावती पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला.
त्यावेळी ती पुणे ते गोवा अशा प्रवासात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी लोहमार्ग पोलीस (Railway Police) आणि
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल (SP Ajay Kumar Bansal) यांच्यासोबत चर्चा केली.
रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गोव्याला जाण्यासाठी ती मुलगी रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला संपूर्ण रेल्वे तपासण्यास दोन मिनिट थांबणाऱ्या गाडीला किमान 5-10 मिनिट थांबवण्याबाबत विनंती केली.
त्यानुसार रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत मुलीला ताब्यात घेतले.

 

Web Title :- Amravati Love Jihad Case | amravati love jihad twist tired
of the family the girl left the house mp navneet rana amravati police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा