‘कोरोना’ग्रस्त खासदार नवनीत राणा यांना श्वास घेण्यास होतोय त्रास, तातडीनं नागपूरहून मुंबईला हलवलं

अमरावती, पोलीसनामा ऑनलाईन  : दि. 13 ऑगस्ट : अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी घेतली होती. त्यात त्या पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते. आता त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, म्हणून त्यांना अधिक उपचारासाठी नागपूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार नवनीत राणा यांची तब्बेत अचानक आणखी बिघडलीय. त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना केले आहे.

आमदार रवी राणा हे देखील त्यांच्यासोबत मुंबईमध्ये येणार आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्याने नवनीत राणा ह्या नागपुरात उपचार घेत होत्या. आता त्या अधिक उपचारासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत.

श्वास घ्यायला त्रास होत होता. तसेच नवनीत राणा यांच्या छातीत अधिक प्रमाणावर दुखत होतं, म्हणून त्यांना थेट मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेऊन मुंबईकडे रवाना झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.