Amrita Fadnavis New Song | ‘नारी, मनहारी…सुकूमारी’; अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Amrita Fadnavis New Song | श्रीलंकन गायिका योहानीने (Yohani) माणिके हिथं हे गाणे गायले होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात जगात व्हायरल झाले होते. तिच्या या गाण्यामुळे सलमान खानने (Salman Khan) योहानीला हिंदी बिग बॉसमध्ये (Bigg Boss) आमंत्रित केले होते. त्या शोमध्ये योहानीने हे गाणे गायले होते. तेव्हा योहानीनं ते गाणं आपल्या सोबत म्हणण्याची विनंती केली होती. पण सलमानला ते गाणे म्हणता आले नव्हते. यानंतर काही दिवसांनी राणू मंडलने (Ranu Mandal) या गाण्याची कॉपी केली आणि हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी हे गाणे गायले (Amrita Fadnavis New Song) आहे. अमृता यांनी गायलेल्या योहानीच्या माणिके मागे हिथे या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

 

 

अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांच्या वेगवेगळ्या गाण्यांवर चाहते उस्फुर्तपणे प्रतिक्रिया देत असतात. गेल्या काही दिवसांपासून चाहते अमृता यांच्या नव्या गाण्याची आतुरतेने वाट बघत होते. आता या नव्या गाण्यानं अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात देखील अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांचे गणपतीवरील,गाणे रिलीज झाले होते. (Amrita Fadnavis New Song)

 

Web Title :- Amrita Fadnavis New Song | devendra fadnavis’s wife and singer amruta fadnavis new song manike mage hite marathi version video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा