Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांकडून चंद्रकांत पाटलांची पाठराखण; म्हणाल्या – ‘एखाद्या स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक करणे यात काही वाईट नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक (Cooking) करणे यात काही वाईट नाही. पण, त्या वक्तव्याचा अर्थ जर वेगळ्या बाजूने घेतला तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो, असं म्हणत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानाची पाठराखण केली आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी कान्स फिल्म महोत्सव (Cannes Film Festival 2022) आणि राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, असा अजब सल्ला दिला होता. या वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अखेर चंद्रकांत पाटील यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. या प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.

 

अमृता फडणवीस म्हणाल्या, आता यावर मी वेगळं काही बोलण्याची फार अशी आवश्यकता नाही. पण राजकीय नेते (Political Leaders) हे बोलण्याच्या झोतात खूप काही बोलून जातात. चंद्रकांतदादा जे बोलले त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण काही राजकीय नेते हे दिलगिरी व्यक्त करत नाही. त्यांना कधीच काही फरक पडत नाही. चंद्रकांत दादांनी तरी स्पष्टीकरण दिले आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली.

 

प्रत्येक स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक केलाच पाहिजे
तसेच ‘मला वाटतं प्रत्येक स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक केलाच पाहिजे. जर तिला आवड असेल किंवा इच्छा असेल तर तिने ते केलं पाहिजे. पण आपण स्त्रीत्व विसरता कामा नये, त्याच्यामध्ये कोमलता आहे. एखाद्या स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक करणे यात काही वाईट नाही. पण जर एखाद्याने काही बोलले त्या वक्तव्याचा अर्थ वेगळ्या बाजूने घेतला तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो आणि त्यावर स्पष्टीकरण देखील देता येऊ शकते’, असे त्या म्हणाल्या.

अन् मी ते ट्विट डिलीट केलं…
देवेंद्रजी मला सोशल मीडियावर काय बोलते, याबद्दल मला काही बोलत नाही. एकदाच ते मला बोलले होते.
त्यानंतर मी ट्विट डिलीट केले. बाकी ते मला कधीच बोलत नाही. मी सोशल मीडियावर (Social Media) रोखठोक शब्दांत बोलते,
त्यामुळे मी ट्रोल होत असते, त्यामुळे त्यांना याबद्दल त्रास होतो. मी असं ट्रोल का व्हावं, याबद्दल ते चिंता व्यक्त करतात.
पण मी एक जागरुक नागरिक आहे.
त्यामुळे एखाद्या मुद्यावर मला बोलावसं वाटलं तर मी नेहमी व्यक्त होते आणि यापुढेही बोलत राहणार असेही त्यांनी सांगितले.

 

महिलांनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवाव
कान्स मध्ये माझ्या लूकबद्दल खूपच चर्चा झाली. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वेगळ्या विचारांचे आहेत.
मला त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. आपल्यात काही वेगळं पण असेल तर ते जपलं पाहिजे.
महिलांनी आपलं वेगळं अस्तित्व कायम टिकवलं पाहिजे याबद्दल त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं आहे.
ते मुख्यमंत्री (CM) झाले त्यावेळी मी ऑफिसमध्ये जात होते. तेव्हा मी जशी होती, तशीच आताही आहे.
फडणवीस आमदार (MLA) होते त्यावेळी मी सोशल वर्क (Social Work) करत होते.
मात्र, देवेंद्र जी मुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांनी माझी दखल घेण्यास सुरुवात केल्याचे अमृता फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta devendra fadnavis suport chandrakant patil says there is nothing wrong with a woman going home and cooking

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Madhuri Mishal | सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार – आमदार माधुरी मिसाळ 

 

PPF Calculator | एक कोटी रुपयांसाठी तुम्हाला करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

 

दूर करा Aadhaar संबंधी भ्रम : प्रत्येक ठिकाणी हे आवश्यक नाही, विना आधार सुद्धा होऊ शकतात अनेक कामे!