Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकात अनेक मुद्द्यावरुन आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळते. यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्यात वाद उफाळला आहे, हाच वाद आता थेट न्यायालयात (Court) गेला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’ असा इशारा त्यांनी दिला. अमृता फडणवीस यांनी थेट विद्या चव्हाणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हा मानहानीचा दावा असून त्याबबतचा खुलासा न्यायालयातच करावा असं देखील त्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, रश्मी ठाकरे यांना राबडी देवी यांची उपमा दिली हे बरं झालं. जर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरे यांची व्हाईट प्रतिमा नाही आहे हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावं वाटतं. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर तक्रार करताना तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे काय काय गुण उधळले त्या विषयी जर ट्वीट केले तर बरे होईल, असं विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी म्हटलं होतं. या प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस या संतापलेल्या पाहायला मिळालं.

Web Title : Amruta Fadnavis | Amruta fadnavis files defamation suit against ncp leader vidya chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे