Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत; जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Calcium For Bones | निरोगी राहण्यासाठी आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक (Calcium for Health) आहे. कॅल्शियमच्या सेवनाने हाडे मजबूत (Calcium For Bones) होतात. नसा, रक्त, स्नायू आणि हृदयाची कमजोरी (Calcium for Heart) दूर होते. आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये 99% कॅल्शियम असते. तर 1 टक्के कॅल्शियम हे रक्त आणि स्नायूंमध्ये असते. यासाठी निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम युक्त आहाराचा समावेश करावा. कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आणि कॅल्शियम समृध्द पदार्थ जाणून घेवूयात.

 

कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत (Calcium Rich Food)

1- सोयाबीन (Soybeans) –
सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. सोयाबीनमध्ये आढळणारे घटक हाडांच्या आजारात लाभ देतात. हाडे मजबूत करण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी सोयाबीन खूप महत्वाचे आहे. तुम्ही टोफूचाही आहारात समावेश करू शकता.

 

2- दूध-दही आणि पनीर (Milk-Curd and Paneer) –
कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी दूध, दही आणि चीज (Cheese) यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. कॅल्शियमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी दूध आणि त्याची उत्पादने एक चांगला स्रोत आहेत.

 

3- तीळ (Sesame)-

सुमारे 1 चमचा तिळात 88 मिलीग्राम कॅल्शियम असते. जेवणात तीळ जरूर वापरावे. तुम्हाला हवे असल्यास ते सलाड किंवा सूपमध्ये घालून खाऊ शकता.

4- हिरव्या भाज्या (green vegetables)-
तुम्ही भाज्यांना तुमच्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनवा. हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हिरव्या पालेभाज्या, बीन्स, ब्रोकोली यांचा आहारात समावेश करा. बीन्स आणि ब्रोकोलीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि प्रथिने असतात. (Calcium For Bones)

 

5 फळे (Fruits) –
फळांमध्ये तुम्ही रोज 2 संत्री खा, यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होईल.

 

6- बदाम (Almonds)-
बदामाला सुपरफूड (Superfood) म्हणतात. बदामातही कॅल्शियम आढळते. दररोज बदाम खाल्ल्याने तुम्ही शरीरातील कॅल्शियमची कमतरता बर्‍याच अंशी दूर करू शकता.

 

7- जिरे (Cumin Seeds) –
जिर्‍याचे पाणी प्यायल्याने कॅल्शियमच्या कमतरतेवरही मात करता येते. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा जिरे टाका आणि हे पाणी दिवसातून 2-4 वेळा प्या.

 

8- मांसाहार (non vegetarian) –
कॅल्शियम आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही मांसाहार करू शकता. तुमच्या आहारात सॅल्मन, टयूना, मॅकरेल आदि माशांचा समावेश करा.

 

9- नाचणी (Nachani) –
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. खीर, भाकरी किंवा डोसा बनवून खाऊ शकता.

 

10- आवळा (Amla) –
आवळ्यातही भरपूर कॅल्शियम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते. आवळा ज्यूस किंवा आवळा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकता.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे (Calcium Deficiency Symptoms)

1- हाडे कमकुवत होतात आणि हाडांमध्ये वेदना होतात.

2- स्नायू दुखतात.

3- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होते.

4- कधी-कधी शरीर सुन्न होण्यास सुरुवात होते आणि हात-पायांमध्ये मुंग्या येतात.

5- कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पीरियडमध्ये गडबड होते.

6- दात कमजोर होतात.

7- रक्त गोठण्याची समस्या उद्भवू शकते.

 

 

Web Title :- Calcium For Bones | calcium for bone health deficiency symptoms and natural food source of calcium

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Restrictions in Maharashtra | लॉकडाउन बद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणाले? मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं..

PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक