Amruta Fadnavis | अमृता फडणवीस पहिल्यांदाच ‘त्या’संदर्भात बोलल्या; म्हणाल्या – ‘Twitter वरील प्रकारामुळे त्यांना माझी चिंता वाटते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ट्विटरवर (Twitter) नेहमीच आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) आणि शिवसेनेवर (Shivsena) टीका करत असतात. कधी-कधी तर त्या आपल्याच ट्विटमुळे ट्रोल होत असतात. ट्विटरवर ट्रोल झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्रास होतो. ते याबद्दल चिंता व्यक्त करत असतात, पण मी ट्विटरवर व्यक्त होतच राहणार, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

 

देवेंद्रजी मला सोशल मीडियावर (Social Media) काय बोलते, याबद्दल मला काही बोलत नाहीत. एकदाच ते मला बोलले होते. त्यानंतर मी ट्विट डिलीट केले. बाकी ते मला कधीच बोलत नाहीत. मी सोशल मीडियावर (Social Media) रोखठोक शब्दांत बोलते, त्यामुळे मी ट्रोल होत असते, त्यामुळे त्यांना याबद्दल त्रास होतो. मी असं ट्रोल का व्हावं, याबद्दल ते चिंता व्यक्त करतात. पण मी एक जागरुक नागरिक आहे. त्यामुळे एखाद्या मुद्यावर मला बोलावसं वाटलं तर मी नेहमी व्यक्त होते आणि यापुढेही बोलत राहणार असेही अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सांगितले.

 

कान्स मध्ये माझ्या लूकबद्दल खूपच चर्चा झाली. परंतु देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या विचारांचे आहेत. मला त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. आपल्यात काही वेगळं पण असेल तर ते जपलं पाहिजे. महिलांनी आपलं वेगळं अस्तित्व कायम टिकवलं पाहिजे याबद्दल त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं आहे. ते मुख्यमंत्री (CM) झाले त्यावेळी मी ऑफिसमध्ये जात होते. तेव्हा मी जशी होती, तशीच आताही आहे. फडणवीस आमदार (MLA) होते त्यावेळी मी सोशल वर्क (Social Work) करत होते. मात्र, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांनी माझी दखल घेण्यास सुरुवात केल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी कान्स फिल्म महोत्सव (Cannes Film Festival) आणि राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, असा अजब सल्ला दिला होता. या वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अखेर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. या प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.

 

अमृता फडणवीस म्हणाल्या, आता यावर मी वेगळं काही बोलण्याची फार अशी आवश्यकता नाही.
पण राजकीय नेते (Political Leaders) हे बोलण्याच्या झोतात खूप काही बोलून जातात. चंद्रकांतदादा जे बोलले त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
पण काही राजकीय नेते हे दिलगिरी व्यक्त करत नाही. त्यांना कधीच काही फरक पडत नाही.
चंद्रकांत दादांनी तरी स्पष्टीकरण दिले आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली.

 

तसेच ‘मला वाटतं प्रत्येक स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक (Cooking) केलाच पाहिजे.
जर तिला आवड असेल किंवा इच्छा असेल तर तिने ते केलं पाहिजे.
पण आपण स्त्रीत्व विसरता कामा नये, त्याच्यामध्ये कोमलता आहे. एखाद्या स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक करणे यात काही वाईट नाही.
पण जर एखाद्याने काही बोलले त्या वक्तव्याचा अर्थ वेगळ्या बाजूने घेतला
तर त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो आणि त्यावर स्पष्टीकरण देखील देता येऊ शकते’, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title :- Amruta Fadnavis | devendra fadnavis thinks i am worried about being trolled on twitter say amruta fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Govt On Monsoon 2022 | पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांकडून चंद्रकांत पाटलांची पाठराखण; म्हणाल्या – ‘एखाद्या स्त्रीने घरी जाऊन स्वयंपाक करणे यात काही वाईट नाही’

 

PPF Calculator | एक कोटी रुपयांसाठी तुम्हाला करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन