Maharashtra Govt On Monsoon 2022 | पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Govt On Monsoon 2022 | पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा (Natural Disasters) धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये, म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या (NDRF) 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मान्सून पूर्वतयारीबाबत (Maharashtra Govt On Monsoon 2022) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापनेने (Maharashtra State Disaster Management) याबाबत माहिती दिली.

 

गेल्या दोन वर्षात पावसाळ्याची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदादेखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यापूर्वी (Maharashtra Monsoon 2022) प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी  समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेश द्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सूनपूर्व बैठकीत केल्या. (Maharashtra Govt On Monsoon 2022)

 

आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, गेल्या दोन वर्षात अचानक कमी कालावधीत जास्त  पाऊस पडला. तसेच निसर्गाचा अंदाज कळत असला तरी कधी काय घडेल हे सांगता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात आपण सर्व यंत्रणांनी मान्सूनपूर्व सर्व तयारी चांगली केली आहे. विशेषत: पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या 9  तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली. ठाणे (Thane) आणि मुंबईत (Mumbai) प्रत्येकी दोन तर कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar) येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची (SDRF) एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल

 

मुख्यमंत्री म्हणाले, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

 

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून
जलसंपदा विभागाने (Water Resources Department) यंत्रणा विकसित केली
असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत.
विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकतो.
तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले
व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे
याचा निश्चित उपयोग होईल, असे  मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Govt On Monsoon 2022 | pre monsoon review meeting in the presence of cm uddhav thackeray ndrfs 9 team posted in 7 districts from 15th june

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Madhuri Mishal | सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता 15 दिवसांत सुरू होणार – आमदार माधुरी मिसाळ 

 

PPF Calculator | एक कोटी रुपयांसाठी तुम्हाला करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

 

दूर करा Aadhaar संबंधी भ्रम : प्रत्येक ठिकाणी हे आवश्यक नाही, विना आधार सुद्धा होऊ शकतात अनेक कामे!