पुण्यात पैशासाठी शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

उसने घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी मित्राच्या मुलीचे अपहरण करण्याचा बनाव रचला खरा, पण चुकून दुसऱ्याच्याच मुलीचे अपहरण प्रयत्न केला. पहिला प्रयत्न फसला म्हणून गप्प बसण्याऐवजी पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला अन अपहरणकर्ते अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडले. अशा तऱ्हेने पैसेही गेले अन फुकट जेलची हवा खाण्याची वेळ मात्र आली. हा सर्व प्रकार घडला आहे वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8bf6aab-cd6a-11e8-96b7-e78982cdfbdf’]

शबाना अकिल शेख (वय-४० रा. जुना खडकी बाजार), अकिल इब्राहीम शेख (वय-४७ रा. जुना खडकी बाजार), नईम गऊस शेख (रा. कोंढवा) यांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोंढवा येथील ३२ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B06Y5HF9GV,B019FGRD90′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c63cca0a-cd6a-11e8-8b48-a116ae5648a5′]

आरोपी यांनी एका व्यक्तीला उसने पैसे दिले होते. अनेकवेळा पैशांची मागणी करूनही ती व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. अखेर आरोपींनी त्याच्या मुलीचे अपहरण करण्याचा डाव आखला. योगायोगाने फिर्यादी आणि ज्याच्या मुलीचे अपहरण करायचे आहे त्याची मुलगी एकाच शाळेत शिकतात. बुधवारी (दि.१०) दुपारी पावणे दोनच्या सुमारास फिर्य़ादी यांची मुलगी शाळा सुटल्यानंतर स्कूल बसची वाट बघत थांबली होती. त्यावेळी आरोपी हे शाळेच्या गेटजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांच्या मुलीला तू तस्मीया (नाव बदलले आहे) आहेस का अशी विचारणा करुन तिला सोबत येण्यास सांगितले.

समलिंगी संबंधांतून आपच्या नेत्याचा खून

मात्र, फिर्यादी यांच्या मुलीने आरोपींसोबत जाण्यास नकार दिल्याने आरोपी महिला त्या मुलीला उचलून घेऊन जाऊ लागली. त्याचवेळी फिर्य़ादी यांच्या मुलीच्या मैत्रिणीने ती तस्मीया नसल्याचे सांगितले. एका स्कुलबस चालकाने देखील ही तस्मिय नसल्याचे सांगितले. ज्या मुलीचे अपहरण कराचे आहे ती ही मुलगी नाही हे समजताच त्यांची काढता पाय घेतला. मात्र  हा सर्व प्रकार फिर्यादी यांची मुलगी सिदरा (नाव बदलले आहे) हिने घरी येऊन आईला सांगितला.

दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी मुलीच्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यांना सर्व हकीकत सांगितली. प्राचार्यानी तस्मीया हिच्या आई-वडिलांना फोन केला. मात्र ते बाहेरगावी असल्याने शाळेत येऊ शकले नाही. दरम्यान, आरोपी पुन्हा अपहरण करण्यासाठी शाळेत आले. त्याचवेळी स्कूल बस चालकाने आरोपींना ओळखले. शाळेत काम करणाऱ्या महिलांनी आरोपींना बोलण्यात गुंतवून ठेवले. फिर्यादी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शाळेत येऊन आरोपींना ताब्यात घेतले आहे.