साताऱ्यात ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप ; नागरिकांमध्ये घबराट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सातारा जिल्हा आज भूकंपाने हादरून गेला. आज सकाळी ७.४७ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवर ४.८ एवढी नोंद झाली आहे. यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे. कोयनापासून १० किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून कोयना धरण सुस्थितीत असल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले आहे.

सकाळी ७. ४८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. सुरुवातीला काहीतरी गुढ आवाज आल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले. मात्र हा भूकंप असल्याचे कळल्यानंतर भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा भूकंप कोयना पाटणसह पोफळी, अलोरे, चिपळूण व कोकणातील अनेक विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर आले. आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी या सर्व नागरिकांनी आसरा घेतला होता.

दरम्यान, या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूंकप जाणवल्याने तीव्रता मोठी असूनही कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो