अवैध वाळुची वाहतुक करणारा ट्रक, ट्रॅक्टर जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यामध्ये वाळु उपसा करण्यास बंदी असतानाही चोरट्यामार्गाने अवैधरित्या वाहतुक सुरुच आहे. सोमवारी मध्यरात्री तहसिलदार किशोर कदम यांच्या भरारी पथकाने कारवाई करून एक ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केला. ही कारवाई मुंबई-आग्रा महामार्गावर करण्यात आली. या कारवाईत ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला.

मुंबई-आग्रा महामार्गावरून एका ट्रक आणि ट्रॅक्टर मधुन वाळुची चोरटी वाहतुक केली जाणार असल्याची माहिती तहसिलदारांना मिळाली. त्यानुसार महामार्गावर गस्त सुरु असताना तहसिलदार यांना लाल रंगाचा मालट्रक हा सोनगीरहून धुळ्याकडे येताना दिसला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक ट्रक घेऊन पसार झाला. महामार्गावर काही अतंर पुढे येत चकवा देत चालकाने रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत ट्रक उभा करुन पसार झाला.

तहसिलदारांनी पाठलाग करत उभ्या असलेला ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये ६ ब्रास वाळु ताडपत्री टाकून झाकून वाळूची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. तहसिलदारांनी ४ लाख ८० रुपयांचा ट्रक जप्त केला. कार्यालयाकडे येताना चाळीस गाव चौफुली जवळ अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारा ट्रॅक्टर (एमएच 41 एएस 5110) पकडला. यामधून अडीच लाख रुपये किंमतीची 6 ब्रास वाळु जप्त करण्यात आली.