आनंद महिंद्रा यांची मागणी – महाराष्ट्रात सर्वांना दिली जावी कोरोना व्हॅक्सीन, स्थिती आता चिंता करायला लावणारी

मुंबई : महाराष्ट्रात दररोज 15 हजारच्या जवळपास नवीन प्रकरणे समोर येत आहेत. सोमवारी सुद्धा राज्यात संसर्गाची नवी प्रकरणे 15 हजारपेक्षा वर गेली होती. नियंत्रणाबाहेर चाललेला कोरोनाचा वेग पाहता राज्य सरकारने थिएटर, रेस्टॉरंट, आरोग्यसंबंधी गोष्टी वगळून प्रत्येक ठिकाणी अर्ध्या क्षमतेसह लोकांना काम करण्यासंबंधी आदेश जारी केला आहे.

दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रात सर्वांना आवश्यकतेच्या आधारावर व्हॅक्सीन देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, जे गरजू आहेत त्यांना आपत्कालीन स्थितीत व्हॅक्सीन घेण्याची परवानगी दिली जावी. सध्या राज्यात 60 वर्षाच्या वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि धोकादायक आजारांनी ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रूग्णांना व्हॅक्सीन दिली जात आहे.

लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला कमजोर करत आहे
आनंद महिंद्रा यांनी सोमवारी ट्विट केले की, देशातील अर्ध्यापेक्षा जास्त नवी प्रकरणे महाराष्ट्रातून समोर आली आहेत. हे राज्य देशाच्या आर्थिक हालचालींचे केंद्र आहे आणि जास्त लॉकडाऊन त्यास आणखी कमजोर करेल. महाराष्ट्रात प्रत्येक इच्छूक व्यक्तीला लस घेण्यासाठी आपत्कालीन परवानगी दिली पाहिजे. व्हॅक्सीनची कमतरता नाही.

महिंद्रा यांनी हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना सुद्धा टॅग केले आहे. महिंद्रा यांनी एका ट्विटच्या उत्तरात लिहिले आहे की, मी सहमत आहे. परंतु जर आपण लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर आपल्याला दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या लाटेचा सामाना करावा लागेल.

मागील आठवड्यातच उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटले होते की, ते 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी पुण्यात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागणार आहेत. परंतु हे सर्व कधी होणार, याचे उत्तर सध्या कुणाकडेच नाही. राज्यात नागपुर, पुणे, मुंबईत कोरोनाची स्थिती वाईट आहे. व्हॅक्सीन आल्यानंतर सुद्धा सरकार कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेत आहे. यामुळे सामान्य नागरिक खुप नाराज आहेत.