‘सायबर बुलिंग’ तरूणांसाठी प्रचंड घातक : अभिनेत्री अनन्या पांडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका बाजूला, इंटरनेटने आयुष्य सोपे झाले आहे, तर वैयक्तिक जीवनातदेखील त्याच्या हस्तक्षेपामध्ये अडचणी वाढल्या आहेत. इंटरनेटमुळे खासकरून लहान आणि तरुण मुले-मुली पीडित आहेत. इंटरनेटचा ‘सायबर बुलिंग’ हा सर्वात भयानक हत्यार आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना देखील या सायबर बुलिंगचा सामना करावा लागतो. चित्रपट ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ मधून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अनन्या पांडेने तर याच्या विरोधात ‘पॉझिटिव्ह’ नावाने ऑनलाईन कॅम्पेन चालवित आहे. अनन्या पांडेचे म्हणणे आहे की, ट्रोलिंग आणि या प्रकारची वर्तवणूक कमी वयाच्या तरुणांच्या डोक्यावर परिणाम करतात. जे बदलावाच्या परिस्थितीमधून जात असतात.

मागच्या महिन्यात अनन्याच्या शैक्षणिक योग्यतेवर सोशल मिडियावर अनेकांनी प्रश्न निर्माण केले होते. जेव्हा तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने यूएससी एनेनबर्ग स्कूल फॉर कम्युनिकेशन एंड जर्नलिजममध्ये अॅमिशन घेतले होते. यानंतर तिने इस्टाग्रामवर कॉलेजच्या कागदपत्रांचे फोटो शेअर केले होते.

एका मुलाखतीत अनन्याने सांगितले की, ‘हे खरे आहे की, या प्रकारचे ट्रोलर्स आमच्या काबिल नाही पण जेव्हा ही घटना माझ्यासोबत घडली याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर पुर्ण परिवारावर झाला होता. माझे या विरोधात उभे राहण्याचे कारण म्हणजे लोकांना समजले पाहीजे की, हे कशाप्रकारे दूसऱ्यांना आकर्षित करतात आणि ते आपल्यासाठी किती घातक आहे’

चर्चे दरम्यान अनन्याने सांगितले की, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतात त्याच्या आधारावर आपण आपल्याविषयी एक धारणा विकसित करत असतो. जेव्हा आपल्याला कोणी वाईट बोलले की लगेच आपण लगेच डगमगतो. त्यावेळी आपल्या शरीर आणि मेंदूमध्ये बदल होत असतो. अशामध्ये जर कोणी आपल्या शरीराबद्दल वाईट बोलत असले तर आपल्याला वाईट वाटते. अनन्या पुढे म्हणाली की, क्रिएटिव्ह आलोचना तिला स्वतःला सुधारण्यासाठी मदत करते. तिचे असेही म्हणणे आहे की, लोक ट्रोल करुन मन जास्त दुखवतात.

 

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?