Anaya Soni | ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक; सेटवर शूटिंग करताना अचानक पडली बेशुद्ध, कुटुंबाकडे नाहीत उपचारासाठी पैसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अभिनेत्री (TV Actress) अनाया सोनीची (Anaya Soni) प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ’मेरे साई’च्या सेटवर शूटिंग (Shooting) करत असताना अनाया अचानक बेशुद्ध पडली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. अनायाच्या वडिलांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अनायाची (Anaya Soni) एक किडनी (Kidney) खराब झाली आहे. तिला अंधेरी पूर्व येथील होली स्पिरिटमध्ये (Holy Spirit) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनायाचे वडील सध्या चिंतेत आहेत. अनाया डायलिसिसवर (Dialysis) असून तिच्या उपचारासाठी लागणारे पैसे कुटुंबाकडे नाहीत. मुलीची किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता कुटुंबियांना सतावत आहे.

 

अनायाच्या (Anaya Soni) इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक पोस्ट करण्यात आली असून यात म्हटले आहे की, डॉक्टर सांगत आहेत की माझी किडनी निकामी झाली आहे आणि मला डायलिसिसवर जावे लागेल. माझे क्रिएटिनिन 15.67 पर्यंत खाली आले आहे आणि हिमोग्लोबिन 6.7 आहे. स्थिती अत्यंत गंभीर आहे.

तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, माझ्यासाठी प्रार्थना करा माझं जीवन सोपं नाही.
पण मी सहजतेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ येणार होती, हे मला माहीत होतं.
मी लवकरच किडनी प्रत्यारोपण (Kidney Transplant) करणार आहे. मी डायलिसिसनंतर किडनीसाठी अर्ज करेन.

 

अनाया सोनीने 2021 मध्ये आर्थिक मदत मागितली होती. 2015 पासून ती फक्त एकाच किडनीवर जगत आहे.
काही वर्षांपूर्वी अनाया सोनीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या.
तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दिली होती. पण दिलेली किडनीही निकामी झाली.

 

अनाया सध्या ’मेरे साई’ टीव्ही शोमध्ये (TV Show) काम करत आहे.
तसेच तिने ’इश्क में मरजावां’, ’है अपना दिल तो आवारा’ आणि ’अदालत’ सारख्या शो मध्ये काम केले आहे.

 

Web Title :- Anaya Soni | ishq mein marjawan mere sai actress anaya soni kidney failure faints on sets needs financial help for treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

 Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क