Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला (State Intelligence Department) मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच तपास सुरू करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना यापूर्वी सुद्धा नक्षलवाद्यांकडून (Naxalite–Maoist) जीवे मारण्याच्या धमक्या (Death Threats) मिळाल्या होत्या. (Maharashtra CM Eknath Shinde)

 

काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

 

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Govt) गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री
(Guardian Minister Of Gadchiroli) असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती.
एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्यावेळी देण्यात आली होती.
मात्र, धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता.

 

Web Title :- death threat to maharashtra CM eknath shinde police on alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर