Andheri Bypoll Result | अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना ‘नोटा’ची टक्कर, अंबादास दानवेंचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Andheri Bypoll Result) सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या अपेक्षेप्रमाणे आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ (Nota) पर्यायाला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटाला मतदान झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीतून (Andheri Bypoll Result) भाजपने माघार घेतली होती. पण, नोटा या पर्यायाला पसंती देण्यासाठी भाजपने (BJP) पैसे वाटले असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Legislative Council Opposition Leader) अंबादास दानवे यांनी सांगितले की, निवडणुकीदरम्यान नोटाचा प्रचार केला. ज्यांनी नोटाचा प्रचार केला ते लोक भाजपचे होते या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळाली आहेत. निश्चितच या निवडणुकीत नोटाचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप भाजपवर लागतो, असे दानवे म्हणाले.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर केलेल्या विधानाचा
समाचार घेताना अंबादास दानवे म्हणाले, राजकारणातील सगळ्या पक्षातील नेत्यांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे.
गुलाबराव पाटील यांचे ते वक्तव्य म्हणजे स्त्रियांचा एक प्रकारे अवमानच आहे, असे दानवे म्हणाले.

नोटाला मतदान करण्यासाठी दबाव टाकला

नोटांचा वापर करुन नोटाला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे
नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केला होता. यासंदर्भातील माहिती आणि पुरावे आमच्याकडे असल्याचा
दावा त्यांनी केला होता. सोशल मीडियावरील विशेष करुन आरपीआय (RPI) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ
क्लिप आपण निवडणूक आयोग (Election Commission) आणि पोलिसांकडे (Mumbai Police)
सादर केल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

Web Title :-  Andheri Bypoll Result | money distributed by bjp for nota in andheri by election serious allegation by ambadas danve

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup | नेदरलँडच्या विजयावर मराठमोळे अभिनेते ऋषिकेश जोशींनी केली हि भन्नाट पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट