‘इरफान-करीना’चा अंग्रेजी मीडियम 20 मार्च ऐवजी ‘या’ तारखेला रिलीज होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री राधिका मदान स्टारर अंग्रेजी मीडियम हा सिनेमा आता नवीन तारखेला रिलीज होणार आहे. आधी हा सिनेमा 20 मार्च रोजी रिलीज होणार होता. परंतु आता नवी डेट मिळाल्यानंतर हा सिनेमा 13 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चाहत्यांनी ट्रेलर खूप कौतुक केलं आहे. चाहतेही इरफान खानला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

प्रोड्युसर दिनेश विजन यांनी सिनेमाची रिलीज डेट बदलण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. विजन म्हणाले, “अंग्रेजी मीडियम अनेक प्रकारे खास सिनेमा आहे. परंतु आपल्या उपचारामुळं आणि दुर्भाग्यानं इरफान खान या सिनेमाचं प्रमोशन करू शकणार नाही. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, इंडस्ट्रीतील अनेक लोक आमच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. 13 मार्च रोजी अंग्रेजी मीडियम आणि 5 जून 2020 रोजी रुही आफ्जा हा सिनेमा रिलीज होणार आहे.”

या सिनेमात स्वप्नांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. एका मुलीचं स्वप्न जिला शिकायचं असतं. जिला पुढे जायचं असतं. परंतु नेहमीप्रमाणे पैसा आणि गरीबी तिच्या रस्त्यात आवडे येतात. पंरतु असं म्हणतात की, प्रमाणिकपणा, कष्ट आणि जिद्दी समोर कोणतीही अडचण जास्त काळ टिकत नाही. असंच काहीसं या सिनेमात पहायला मिळत आहे.

सिनेमात कॉमेडी आणि इमोशन अशी दोन्ही गोष्टी पहायला मिळत आहे. होमी अदजानियानं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. या सिनेमात दीपक डोबरियालनं इरफान खानच्या मित्राची भूमिका साकरली आहे. करीना कपूरनं या सिनेमात लंडनच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

You might also like