अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !’माझ्या नावाच्या फेक YouTube चॅनलवरून पॉर्न व्हिडीओ अपलोड होतायत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कोइना मित्रा हिच्या नावानं एका फेक युट्युब चॅनलवरून पॉर्न व्हिडीओ अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द कोइनानंच यासंदर्भात माहिती दिली आहे. कोइनानं याविरोधात सायबर पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे.

जो प्रकार समोर आला त्यानंतर कोइना मित्रा खूपच संतापली. तिनं काही तिच्या नावाच्या युट्युब चॅनल आणि इंस्टा अकाऊंटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ट्विटमध्ये कोइना म्हणते, “हे फॅन क्लब आहे असं तुम्हाला वाटतं का ? जे माझ्या माझ्या नावानं असे फोटो आणि व्हिडीओ टाकून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा हे अकाऊंट पहा. हा गुन्हा नाही तर काय आहे ?” असं म्हणत तिनं संताप व्यक्त केला आहे.

कोइनानं आणखी एक ट्विट केलं आहे. यात ती म्हणते, “हे दोन्हीही आक्षेपार्ह आहेत. सर्वात आधी हे कोणतेही फॅन पेज नाहीत. कोण आहेत साहिल आणि सना खान ? ते माझ्या नावानं युट्युब चॅनही चालवत आहेत. त्यांनी पॉर्न व्हिडीओदेखील अपलोड केले आहेत. कोणतीही कमेंट करण्याआधी इंस्टावरील बायो वाचा.”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोइना म्हणाली की, “डिसेंबरपासूम मला इंस्टा अकाऊंट क्रिएट करण्यासाठी विनंती केली जात आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या महिन्यात मी यावर विचार केला. जेव्हा मी अकाऊंट क्रिएट करायला गेले तेव्हा मला कळालं की, माझ्या नावानं तिथं आधीच फेक अकाऊंट आहे आणि जवळपास 36000 लोक ते फॉलो करत आहेत.”

पुढे बोलताना कोइना म्हणाली, “मी यासंदर्भाता सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी. माझ्या नावाखाली कोणाची फसवणूक तर नाही झाली ना हेहीप एकदा पहावं.” असंही ती म्हणाली.