अनिल अंबानींची नवी पिढी आली पुढं, अनमोल आणि अंशुल ‘रिलायन्स इन्फ्रा’च्या बोर्डावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनिल अंबानी समूहाची नवी पिढी आता उद्योगात उतरत आहेत. रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे दोन सुपुत्र अनमोल आणि अंशुल अंबानी यांना तात्काळ रिलायन्स इन्फ्रा बोर्डमध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून सांगण्यात आले की दोघांना गैर कार्यकारी संचालकाच्या पदभारासोबत अतिरिक्त संचालक म्हणून जॉइन करण्यात आले आहे. हे दोघेही आता अतिरिक्त संचालक म्हणून एजीएमच्या पुढील बैठक भाग घेतील. 28 वर्षीय अनमोल अंबानी 2014 मध्ये रिलायन्स कॅपिटलबरोबर इतर एडीएजी कंपन्यांच्या बोर्डात सहभागी होते. अनमोलने ब्रिटनच्या वारविक बिजनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटमधून बीएससी पर्यंत शिक्षण घेतले आहे.

तर 24 वर्षीय अंशुल अंबानी यांनी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिजनेसमधून पदवी घेतली आहे. त्यांनी बिजनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. ते जानेवारी 2019 पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर आणि ग्रुपमधील इतर कंपन्यांच्या बोर्डात सहभागी होणार आहेत.

सैय्यद अता हसनैन यांना देखील स्वतंत्र संचालकाच्या रुपात रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. 66 वर्षीय हसनैन रिलायन्स होम फायनांस लिमिटेडच्या बोर्डात सहभागी आहेत. रिलायन्स एसेस्ट आणि म्यूचूअल फंड, पेंशन फंड, विमा, वित्त, स्टॉक ब्रोकिंग, वित्तीय उत्पादनांचे वितरण, प्रॉपर्टी गुंतवणूक आणि इतर काही वित्तीय सेवांच्या उद्योगात सहभागी आहे.

काय आहे कर्जमुक्त होण्याचा कंपनीचा प्लॅन
रिलायन्स इन्फ्रा 2020 पर्यंत पूर्णता कर्ज मुक्त होऊ इच्छित आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने सांगितले की, आरबीआयच्या 7 जून 2019 च्या सूचनेनुसार रिलायन्स इन्फ्राने कर्जाचे समाधान करण्यासाठी आपल्या 100 टक्के कर्जदात्यांना आयसीए केले आहे.

समूहावर एकूण 93,900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स नवल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंगवर 7,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एकूण 17,800 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स कॅपिटलवर 38,900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिलायन्स पॉवरवर 30,200 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

आरबीआयच्या सूचनेनुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या कर्ज समाधान योजनेला 180 दिवसांच्या आता लागू करण्यात येईल. कंपनीला विश्वास आहे की या वेळेत ते कर्जमुक्त होतील. कंपनीने सांगितले की दिल्ली – आग्रा टोल रोडचा उद्योग 3,600 रुपयांना विकला जाईल. या विक्रीने रिलायन्स इन्फ्राची 25 टक्के कर्ज मुक्ती होईल. एकूण 9 रस्ते योजनांचा उद्योग विकून रिलायन्स इन्फ्रा एकूण 9000 कोटी रुपये जमा करेल.

visit : policenama.com 

 

You might also like