Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना सीबीआयची क्लिन चिट? CBI च्या उपअधीक्षकांनाच वाटत नाही आरोपात तथ्य

मुंबई : Anil Deshmukh | मीडिया रिपोर्टनुसार राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसून त्यांची चौकशी ही जाणीवपूर्वक आणि आकस ठेवून करण्यात येत असल्याचे सीबीआयच्या उपअधीक्षकांनाच वाटत आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सीबीआयचे उपअधीक्षक व तपास अधिकारी आर. एस. गुंजाल यांनी 15 दिवसांच्या सखोल चौकशीनंतर अनिल देशमुख यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याने चौकशी बंद करण्याची शिफारस केली होती. परंतु ही बाब कोर्टासमोर मांडण्यातच आली नाही. तपास अधिकार्‍याची शिफारस डावलून एफआयआर नोंदविला गेला असा दावा करणारी कागदपत्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशमुख यांच्या निवासस्थानी वाझे आणि देशमुख यांच्यात कोणतीही बैठक झाल्याचा पुरावा नाही. तसेच मुख्यमंत्री यांच्याकडील बैठकांना वाझे हे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबतच जात असत. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ACP संजय पाटील (ACP Sanjay Patil) व राजू भुजबळ (Raju Bhujbal) या अधिकार्‍यांना गृहमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे निधी जमवण्यासाठी पालंडे यांच्याकडून सांगितले, याचाही पुरावा नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

अ‍ॅटिलिया प्रकरण घडल्यानंतर अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, 30
वर्षाच्या कारकिर्दीत आपल्यावर एकही आरोप नसल्याचे आणि अँटिलिया प्रकरणात परमबीर सिंह यांचाच हात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

या अहवालामुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. देशमुख यांच्याभोवती आरोपांचे
गुढ वलय उभे केले गेले असले तरी त्यांना अटक करण्यास केंद्रीय यंत्रणा धजावत नसल्यामागे, ठोस
पुरावे नसणे हेच कारण असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचबरोबर सीबीआय
तसेच सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर
वारंवार छापे घातले होते. या दोन्ही एजन्सींकडे पुरेसे पुरावे नसल्याने ते शोधण्यासाठीच हे वारंवार
छापे घातले गेल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

हे देखील वाचा

Jayant Pawar | ज्येष्ट नाटककार जयंत पवार यांचे निधन

Pune Crime | आईला मारहाण प्रकरणात 3 मुलांसह इतरांना जामीन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Deshmukh | clean chit to former home minister anil deshmukh in rs 100 crore case parambir singh sachin waze

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update