Anil Deshmukh | देशमुख पिता-पुत्रांनी ईडीला दाखवली पाठ, दाेघेही चौकशीसाठी गैरहजर

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Anil Deshmukh | मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना व त्यांचे पुत्र ऋषीकेश यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स सक्तवसुली संचालनालयाने (ED) बजावले होते. मात्र, दोघांनी ही या चौकशीकडे पाठ फिरवली. दोघेही बुधवारी ईडीच्या कार्यालयाकडे फिरकलेच नाही. तर त्यांच्या वकिलांनी पत्र पत्र देऊन ईडीच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मागितली आहे.

सोमवारी देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईला तातडीने स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर ईडीने मंगळवारी अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र ऋषीकेश यांना समन्स बजावून चौकशीसाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता बेलार्ड पियार्ड येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, हजर होण्यास त्यांनी टाळले असून त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटून पत्र दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ॲड. सिंग म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे अंतिम आदेशानंतरच देशमुख कुटुंबातील व्यक्ती चौकशीला हजर राहतील. तपास यंत्रणेला सहकार्य करण्यात येत आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच देशमुख चौकशीला हजर राहणार असून तोपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती ईडीला केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीचा गेल्या तीन महिन्यांपासून देशमुखांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.

 

Web Title : Anil Deshmukh | deshmukhs father and son turn their backs ed office both absent questioning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nanded Traffic Police | मुसळधार पावसात बजावलं कर्तव्य, वाहतूक पोलिसाला मिळालं वरिष्ठांकडून ‘सरप्राईज’

Bleach | ब्लीच नंतर चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटण्यापासून आराम मिळवा; काही घरगुती गोष्टी वापरुन पाहा

Gang Rape | नोकरी देण्याच्या बहाण्यानं धावत्या कारमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार