Anil Deshmukh । ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयानं (ED) छापा टाकला. आज (शुक्रवारी) सकाळीच कारवाईसाठी ईडी पथक दाखल झाले. तसेच, देशमुख यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले. ईडीकडून दोनवेळा देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकला गेला. यावरून भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावर एक वक्तव्य केलं आहे. ‘काही दिवसांनी अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) रवानगी तुरूंगात होणार असल्याचं किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, ‘अनिल देशमुखच्या घरी आज ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्यामधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे तीन वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची (Anil Parab) देखील अशीच अवस्था होणार असल्याचं सोमय्यांनी (Kirit Somaiya) म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, तसेच, ‘ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्टर अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच (Anil Deshmukh) होईल. असे देखील सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे.

ईडीकडून अनिल देशमुखांच्या घरी छापा –

गुरूवारी रात्रीच सक्तवसुली संचालनायलयाचे (ED) पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी (25 जून) सकाळी स्थानिक EDअधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जीपीओ चौकातील घरी आणि निकटवर्तीयांकडे धाड टाकली. दरम्यान, 16 जूनला ईडीच्या 3 पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित 2 सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Anil Deshmukh | ed raided on anil deshmukh residence i am sure in few days he will be in jail bjp leader kirit somaiya

 

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’