Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | मनी लॉड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सचिन वाझेसह (Sachin Waze) १४ जणांविरोधात आरोप लावले आहे. मात्र या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांचा या आरोपपत्रात समावेश आहे.

Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

मुंबईतील बार मालकांकडून (Bar Owner in Mumbai) वसुली प्रकरणात शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही यामध्ये लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात ईडीने देशमुखांशी (Anil Deshmukh) संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स ही बजावण्यात आले. मात्र देशमुखांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. समन्स रद्द होण्यासाठी देशमुखांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. दरम्यान ईडीने याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये सचिन वाझे, देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यासह १४ जणांवर आरोप लावण्यात आला आहे. मात्र अनिल देशमुख यांचे नाव आरोपपत्रात नसल्याचे समोर आले आहे. ईडीने देशमुख यांची चौकशी झाली नसल्याने त्यांचे नाव यामध्ये नसल्याचे सांगितले आहे.

देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यानंतर ईडीने चार ते पाच वेळा अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. मात्र ते उपस्थित राहिले नाही. त्यानंतर देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश यांनाही दोन वेळा समन्स बजावले होते. सुरुवातीला देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. त्यामुळे ईडीने देशमुख यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.महत्त्वाचे म्हणजे अशातच ईडीने देशमुखांच्या शोधासाठी सीबीआयकडे मदत मागितली आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापुर्वी जन्मलं ‘बाळ’, 25 वर्षीय तरूणीने प्रियकरानं ‘बरेवाईट’ केल्याचं मुंढवा पोलिसांना सांगितलं

LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anil Deshmukh | ed told why name anil deshmukh not included chargesheet regarding money laundering case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update