Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला ! ‘या’ तारखेला होणार सुनावणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh यांच्या जामीनावर उत्तर देण्यासाठी ईडीने (ED) वेळ मागितल्याने या प्रकरणाची सुनावणी आता 8 एप्रिलला होणार आहे.

 

ईडीने कोर्टाकडे वेळ देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केल्यामुळे कोर्टानं तपासयंत्रणेला आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश जारी करत दोन आठवड्यांनी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई (Justice Anuja Prabhudesai) यांच्यासमोर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी (Preliminary Hearing) पार पडली.

 

अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामीनासाठी याचिका दाखल केली होती.
यामध्ये देशमुख यांनी वाढतं वय, कोविड (Covid), उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि निखळलेला खांदा या वैद्यकीय कारणांचा उल्लेख केला आहे.

 

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला देशमुखांनी या याचिकेतून उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Commissioner of Police Parambir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पोलीस दलातील सचिन वाझे 100 कोटींचा हप्ता देशमुखांसाठी (Anil Deshmukh) जमा करत असल्याचं पत्रात म्हटलं होतं.
या प्रकरणामुळे देशमुखांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीकडून चौकशी चालू आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | Former home minister anil deshmukhs bail application will be heard on 8 april

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा