Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा आयोगासमोर मोठा दावा, म्हणाले – ‘…त्यावेळी परमबीर सिंह थरथर कापत होते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगासमोर (Justice Kailash Chandiwal Commission) महत्त्वपूर्ण दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके (Antilia Bomb Scare Case) ठेवली होती. त्यासंदर्भात मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना ही माहिती राज्य सरकारकडून (Maharashtra Government) का दडवून ठेवली असे विचारले असता ते थरथर कापत होते, अशी माहिती देशमुख यांनी आयोगाला दिली.

 

न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर बुधवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचे वकील योगेश नायडू (Lawyer Yogesh Naidu) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची उलटतपासणी घेतली. त्यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी देशमुख यांनी हा दावा केला आहे. परमबीर सिंह यांची चौकशी करताना वाझे हे आपल्या इतक्या जवळचे होते, तर मग त्यांनी तुम्हाला अँटिलिया स्फोटकांप्रकरणी माहिती दिली नव्हती का, असेही आम्ही विचारले होते. त्यावर सिंह यांनी वाझेने काय केले हे आपल्याला माहित नसल्याचे सांगितले होते. तीन अधिकाऱ्यांसमोरच सिंह यांना या स्फोटकांचा तपास एटीएसकडे द्यावा असे सांगितले. पण त्यांनी त्याला विरोध केला असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला. त्यानंतर 6 मार्च 2021 ला तो तपास एटीएसकडे (ATS) देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 7 मार्चला खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला, असे देशमुख यांनी सांगितले.

विधानसभेत तारांकित प्रश्नांत डी. सी. डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड (DC Design Pvt Ltd) या कंपनीसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासंदर्भात त्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत ब्रीफिंग केले होते, इतर प्रकरणांमध्ये त्यांच्याशी वैयक्तिक बोलणे झाल्याचे मला आठवत नाही, असेही देशमुख यांनी सांगितले. दरम्यान पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक केली म्हणून अँटिलियाप्रकरणी वाझेंवर खोटे आरोप लावण्यात आले होते, असे आपण विधानसभेत सांगितले होते का, असा प्रश्न केला असता देशमुख म्हणाले की, सभागृहात वाझेंचा मी बचाव करण्याचा प्रश्नच नाही. विरोधी पक्षनेत्यांनी अँटिलिया प्रकरणात काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर याची सविस्तर माहिती घेऊन सभागृहात उद्या सांगेन, एवढेच सभागृहात सांगितल्याचे देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title :- Anil Deshmukh | Mumbai Ex CP Parambir Singh shivering when quizzed says former home minister anil deshmukh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा