Anil Deshmukh Sent To CBI Custody | अनिल देशमुखांची आता CBI कोठडीत रवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Deshmukh Sent To CBI Custody | न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करण्यात आला आहे. आजच सीबीआयने देशमुख यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावण्यात आली आहे. याबाबत निर्णय मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष सीबीआय कोर्टाने (CBI Court) दिला आहे.

 

अनिल देशमुख यांना दिल्लीत चौकशीसाठी न्यावे लागणार आहे. म्हणून देशमुखांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती सीबीआयने न्यायालयात केली होती.

 

दरम्यान, यावर देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला होता. अनिल देशमुखांनी आतापर्यंत तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकत नसल्याचं अनिल देशमुख यांच्या वकीलांनी सांगितलं होतं.

 

मात्र, यावर न्यायालयाने सीबीआयची मागणी स्वीकारून अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे.
आता देशमुखसह आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze), संजीव पालांडे (Sanjeev Palande), आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde)
यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुखांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Prison) ताब्यात घेतले आहे.
विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला देशमुख यांना ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली.
देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम (Adv Aniket Nikam) यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेलाही आव्हान देण्यात आले होते. असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh Sent To CBI Custody | Former home minister of maharashtra anil deshmukh sent to cbi custody by special court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा