API Vijaykumar Shinde | दीड महिन्यात 40 गुन्हे उघडकीस, API विजयकुमार शिंदे यांचा CP अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – API Vijaykumar Shinde | पुणे शहरामध्ये गुन्ह्यांचे (Pune Crime) प्रमाण वाढत असताना गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. पुणे पोलीस (Pune Police) दलातील हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी 40 गुन्हे तपास पथकाने (Investigation Team) उघडकीस आणले आहेत. तसेच 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी करणाऱ्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde) यांचा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने 10 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2022 या कालावधीत एकूण 40 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये घरफोडीचे (Burglary) 14 गुन्हे, वाहन चोरी (Vehicle Theft) -13, सराफांची फसवणूक (Cheating) -7, जबरी चोरी-3, इतर चोरी-2, आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) -1 असे गुन्हे तपास पथकाने उघडकीस आणले आहेत. तसेच 42 लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल तपास पथकाचे एपीआय विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde) यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांना प्रमाणपत्र दिले.
यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve) यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title :- API Vijaykumar Shinde | 40 cases solve in a month and a half, API Vijaykumar Shinde honored with a testimonial from CP Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Modi-Sharad Pawar Meeting | पंतप्रधान मोदींसोबत कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली?; स्वत: शरद पवारांनी सांगितलं…

 

Pune Crime | मंडप व्यावसायिकाला ऑनलाइन 12 लाखांचा गंडा, पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून दोघांना केली अटक

 

Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये कशावर चर्चा झाली?; अजित पवारांनी अंदाज व्यक्त करत सांगितलं कारण