Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : चौकशीला हजर राहण्याबाबत ED चे अनिल देशमुखांना समन्स, ‘या’ 6 मुद्द्यावर होणार चौकशी

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – दरमहा 100 कोटींच्या हप्ता वसुली प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) मंगळवारी (दि.29) समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीला 6 प्रकरणात देशमुखांची चौकशी करायची आहे. देशमुखांना ईडीने समन्स बजावल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी का करायची आहे, याची माहिती ईडीचे वकील इंद्रपाल सिंग (Indrapal Singh) यांनी न्यायालयात दिली आहे. देशमुखांकडे असलेली मालमत्ता, नातेवाईकांच्या नावावर असलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता, 5
वर्षाचा आयकर परतावा. नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा तपशील, गेल्या 5 वर्षात जमा
झालेली देणगी याची चौकशी करायची आहे.

तसेच देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Private Secretary Sanjeev Palande), स्वीय सहायक कुंदन शिंदे (Self-help Kundan Shinde) यांच्यात काय संवाद झाला. आर्थिक व्यवहाराचा तपशील काय आहे, याबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्याची भूमिका ईडीने स्पष्ट
केली आहे. ईडीने (ED) न्यायालयात माहिती दिल्यानंतर देशमुखांच्या वकिलांनी यासाठी वेळ मागितला आहे. खुद्द देशमुखांनी ईडीला (ED) पत्र पाठवून 7 दिवसांची मुदत मागितली आहे. आपल
वय आणि कोरोनाची परिस्थिती यामुळे चौकशीला हजर न राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती
देशमुखांनी ईडीकडे (ED) केली आहे. तर दुसरीकडे काल राष्ट्रवादीची बैठक झाली असून बैठकीत
देशमुख यांच्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation । पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावाबाबत अजित पवारांचा महत्वपूर्ण निर्णय

7th Pay Commission latest news | सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होणार घसघशीत वाढ, जाणून घ्या किती वाढणार तुमचा पगार

Mumbai High Court । ‘ठाकरे सरकार प्रत्येक कामासाठी केंद्राची मंजुरी घेते?’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Anil Deshmukh should be inquiry by ed on these 6 issues anil deshmukh is in trouble

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update