अण्णा हजारे यांचे पुन्हा मोदींना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी गांधी जयंती पासून म्हणजे २ आक्टोंबरपासून राळेगणसिध्दीत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अण्णांनी यापूर्वी केलेल्या उपोषणादरम्यान सरकारने लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता न करण्यात आल्याने अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

[amazon_link asins=’B072FJPFTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00bf3a3b-b4c1-11e8-8e87-1b277c92d4b5′]

२९ ऑगस्ट रोजी राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी अण्णांना पत्र पाठवून लोकपाल, लोकायुक्त अधिनियम २०१३ नुसार सरकार काय करत आहे, याची माहिती दिली होती. मात्र, २९ मार्चला ज्या ११ मुद्यांवर सरकारने आश्वासनपूर्तीचा शब्द दिला होता, त्याचा कसलाही उल्लेख पत्रात नाही. म्हणून २ आक्टोंबरला गांधी जयंती दिनी राळेगणसिध्दीत आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे अण्णांनी मोदी यांना स्पष्ट केले आहे.

ओबीसीमध्ये समावेश हाच मराठा आरक्षणासाठी सोपा पर्याय : खेडेकर

लोकपाल, प्रत्येक राज्यात लोकायुक्त, स्वामीनाथन आयोगाची अमंलबजावणी या मुद्दांवर अण्णा हजारे यांनी २३ मार्च रोजी रामलीला मैदानावर आंदोलन केले होते. आंदोलनाच्या सातव्या दिवशी पीएमओ कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ११ मुद्यांवर तोडगा काढत ६ महिन्यात निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन तेव्हा दिले होते. त्यावेळेस केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांनी उपोषण सोडले होते. सहा महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन ५ महिने उलटल्यानंतरही निर्णय घेण्यात आला नाही, म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे.