Annabhau Sathe Mahamandal Scam | पुणे : सीआयडीच्या भरारी पथकाने वाहनाच्या फास्ट टॅगवरून 367 कोटी रूपयांच्या घोटाळयातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा : पुण सीआयडीच्या भरारी पथकाकडून 8 वर्षापासुन फरार असलेल्या कमलाकर ताकवालेला संगमनेर येथून अटक

पुणे (नितीन पाटील) : पोलीसनामा ऑनलाइन – Annabhau Sathe Mahamandal Scam | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा (Annabhau Sathe Development Corporation scam) प्रकरणात गेल्या 8 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या Criminal Investigation Department Maharashtra State (CID) भरारी पथकाने (Pune CID Flying Squad) संगमनेर (Sangamner) येथून अटक केली आहे. गेल्या 8 वर्षापासुन तो स्वतःचे नाव बदलून पुणे (Pune), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात वास्तव्यास होता. पुणे सीआयडीच्या भरारी पथकाने वाहनाच्या फास्ट टॅगवरून ( FASTag) 367 कोटी रूपयांच्या घोटाळयातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Annabhau Sathe Mahamandal Scam)

 

कमलाकर रामा ताकवाले Kamalakar Rama Takwale (40, रा. सराफनगर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ताकवाले याला राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून अटक करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2012 ते सन 2015 दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन आमदार रमेश नागनाथ कदम (Former NCP MLA Ramesh Kadam) व महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम.डी. श्रावण किसन बावणे (Shravan Kisan Bawane) आणि इतर महामंडळाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपआपसात संगणमत करून एकुण 367 कोटी रूपयांचा शासनाचा विश्वासघात करून अपहार (Fraud Case) केला होता.

या घोटाळयाप्रकरणी (Cheating Case) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे एकुण 7 गुन्हे तपासावर आहे.
सर्वप्रथम दहिसर पोलिस स्टेशनमध्ये (Dahisar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्हयातील तब्बल 26 आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल (Chargesheet In Annabhau Sathe Mahamandal Scam) करण्यात आलेले आहे. गुन्हयातील मुख्य आरोपी व महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन आमदार रमेश कदम हा गेल्या 8 वर्षापासून जेलमध्ये आहे. (Annabhau Sathe Mahamandal Scam)

गुन्हयातील आरोपी कमलाकर रामा ताकवाले हा गुन्हा दाखल झाल्यापासुन मिळून येत नव्हता. न्यायालयाने ताकवाले याला फरार घोषित केले होते. तो गेल्या 8 वर्षापासुन फरार झाला होता. तो स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्हयात रहावयास असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. प्राप्त माहितीवरून भरारी पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे गेल्या 4 महिन्यांपासुन ताकवाले याचा छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहमदनगर परिसरात शोध घेत होते. दरम्यान, तो अहमदनगर जिल्हयातील अकोले आणि संगमनेर तालुक्यात स्वतःचे नाव बदलून रहावयास असल्याची व एम चारचाकी वाहन वापरत असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली.

भरारी पथकाने वाहनाच्या फास्ट टॅगच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे ठरवले.
पोलिसांनी गोपनिय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी
कमलाकर रामा ताकवाले याला संगमनेर येथील हॉटेल अहमदमधून ताब्यात घेतले.
कायदेशीर कारवाईची पुर्तता करत भरारी पथकाने त्याला अटक केली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागचे अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे (IPS Prashant Burde),
पोलिस उप महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) सारंग आव्हाड (IPS Sarang Awad),
भरारी पथकाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश गि. बारी (SP Dr. Dinesh Bari)
यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक अनुजा देशमाने (Addl SP Anuja Deshmane)
यांच्या अधिपत्याखाली पोलिस निरीक्षक दिनेश पाटील (PI Dinesh Patil),
पोलिस हवालदार कृष्णकांत देसाई, पोलिस हवालदार राजेंद्र दोरगे आणि राजूर पोलिस स्टेशनमधील
(Rajur Police Station) पोलिस अंलदार अशोक गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Annabhau Sathe Mahamandal Scam | Pune CID Flying Squad Arrest Kamalakar Rama
Takwale Rajur Police Station Sangamner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | G20 साठी CSR मधून रस्ता दुभाजकावर केलेल्या सुशोभिकरणावर मेट्रो, महापालिका प्रशासनचा ‘राडारोडा ’

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरची साऊथमध्ये दमदार एन्ट्री; ‘या’ सुपरस्टार सोबत करणार स्क्रीन शेअर

Chitra Wagh | ‘उद्धवजी तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार’, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा