पोलीसनामा ऑनलाइन टीम – वेब सीरिज ’24’ मध्ये एसबीआय एजंट रेनी वॉकरची दमदार भूमिका साकारणारी हॉलीवुड अभिनेत्री अॅनी वर्शिंग (Annie Wersching) आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. मात्र अॅनी वर्शिंगच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. अॅनीने वयाच्या 45 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. अॅनीच्या (Annie Wersching) निधनाची बातमी तिच्या प्रवक्त्याने दिली आहे. मात्र अद्याप तरी अॅनीला कोणता कर्करोग झाला होता हे स्पष्ट झाले नाही.
अभिनेत्रीच्या निधनानंतर ‘द लास्ट ऑफ अस’ या व्हिडिओ गेमचे निर्माते निल ड्रकमन यांनी अभिनेत्रीच्या निधनावर दुःख व्यक्त करत ट्विट केले आहे. यावेळी निलने ट्विट करत म्हटले की, “आम्ही एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. तू खूपच सुंदर व्यक्ती होतीस. तू आम्हाला लवकर सोडून गेलीस. तू नेहमीच आमच्या आठवणीत राहशील” अभिनेत्रीने या व्हिडिओ गेम मध्ये टेस या पात्राला आवाज दिले होते.
I miss my silly friend who helped bring Tess to life. Annie, you left us way too soon. You will forever be part of the TLoU & Naughty Dog family! 💔
TLoU fans… let’s show what we’re made of. Please consider donating to her kids’ gofundme: https://t.co/3QTnZtBY4B pic.twitter.com/baNHc1wdCT
— Neil Druckmann (@Neil_Druckmann) January 29, 2023
अॅनी अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसली होती. यात ‘स्टार ट्रेक: एण्टरप्राइज’, ’24’, ‘बॉश’, ‘द व्हॅम्पायर डायरीज’,
‘रनवे’, ‘द रुकी’ आणि ‘स्टार ट्रेक: पिकार्ड.’ या मालिकांचा देखील समावेश होता.
अॅनीच्या (Annie Wersching) पश्चात तिचा पती व तीन मुले असा परिवार आहे.
अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वांनाच फार मोठा धक्का बसला आहे.
तर सोशल मीडियावर अनेक जण अॅनीला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. तिच्या जाण्याने सिनेसृष्टीत एकच शोककळा पसरली आहे.
Web Title :- Annie Wersching | annie wersching death athe age of 45
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू