राष्ट्रवादीच्या ९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षांच्या निवडीची तिसरी यादी आज (मंगळवार) जाहीर केली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये ९ जिल्हाध्यक्ष आणइ कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्त करण्यात आलेल्या ९ जिल्हाध्यक्ष आणि कार्य़ाध्यक्ष यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

[amazon_link asins=’B01HQ4O058,B00ZR9C9Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a34fd012-a555-11e8-b5fe-5b3cb2fee83c’]

आज जाहीर करण्यात आलेली जिल्हाध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे:

सिंधुदर्ग- सुरेश गवस, पनवेल शहर- सतिश पाटील, अहमदनगर ग्रामीण- जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष-संदीप वर्पे, बीड-बजरंग सोनवणे, अकोला ग्रामीण-संग्राम गावंडे, चंद्रपूर शहर-राजीव कक्कड, चंद्रपूर ग्रामीण-संदीप गड्डमवार, नांदेड शहर-सुनिल कदम, नांदेड ग्रामीण- बापूसाहेब गोरठेकर

उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.