‘ठाकरे सरकारधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जाईल’ – चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जाईल असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. आज कोल्हापुरात ते बोलते होते.

‘तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील’

चंद्रकांत पाटील म्हणाले, या महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनिल राठोड या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, दुसरे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील असं भाकित देखील पाटील यांनी केलं. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

‘वेट अँड वॉच’

दरम्यान राजीनामा देणाऱ्या त्या मंत्र्याचं नाव काय असेल असं विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी वेट अँड वॉच असं उत्तर दिलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात घडणाऱ्या घडामोडींवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

‘हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे’

सचिन वाझे प्रकरणी बोलताना ते म्हणाले, हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही पाटील यांनी केला.