पुन्हा एकदा नक्षली हल्ला : १ जवान तर ३ नागरिक ठार 

छत्तीसगड : वृत्तसंस्था – नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला आहे. या हल्यात एक जवान शहीद झाला असून तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात केलेला हा दुसरा हल्ला आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे.

सीआयएसएफची एक टीम मिनी बसमधून आकाश नगरकडे जात होती. हा त्यांचा नेहमीचाच मार्ग होता.याचबरोबर त्यांना सहकाऱ्यांसाठी बाजारातून भाजीपालाही आणायचा होता.

दरम्यान  आकाश नगरच्या मोड नंबर ६ वरून बस वळण घेत असतानाच नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला. आयईडी ब्लास्ट झाल्याने सीआयएसएफची बस हवेत  ८ फूट उंच उडाली. दरम्यान नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या बसवर प्रचंड गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी सुमारे १५ मिनिटे गोळीबार केला आणि घोषणाबाजी केली. आणि तेथून निघून गेले.

नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या बसवर केलेल्या हल्यात ७ जवान जखमी झाले असून त्यापैकी ३ जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे  सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या छत्तीसगडच्या जगदलपूर येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. दंतेवाड्यापासून जवळ असलेल्या बस्तर विधानसभा मतदारसंघात जगदलपूर आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणरा आहे. १२ नोव्हेंबरला पहिल्या तर १८ नोव्हेंबरसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी हे मतदान होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us