CAA विरोधात विद्यार्थ्यांचे शाळेत नाटक सादर, शाळेवर देशद्रोहाचा आरोप

बिदर : वृत्तसंस्था – देशात सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरु असताना कर्नाटक मधील बिदर येथील शाहीन ग्रुपच्या शाळेत सीएए विरोधात नाटक सादर करण्यात आले. हे नाटक बसवणं शाळेला चांगलेच महागात पडले असून या शाळेविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. शाळेतील चौथीच्या मुलांचे सीएएविरोधात एक नाटक बसवण्यात आले होते. या नाटकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्यात आला होता.

बीदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेने रविवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे नाटक सादर केले होते. यामध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीएए आणि एनआरसी लागू झाल्यास मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्यात येईल असे दाखवण्यात आले होते. तसेच नाटकातील एका पात्रात नरेंद्र मोदी यांच्याविषयी असभ्य भाषेत बोलताना दाखवण्यात आले होते.

एकीकडे देशाच्या वेगवेगळ्या भागात सीएएविरुद्ध आंदोलनं सुरु आहेत तर दुसरीकडे बीदरमधील शाळेत या कायद्याविरोधात नाटक बसवण्यात आले. या नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्यात आला. एवढेच नाही तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन दिल्याचे दिसून आले. कार्यक्रम पाहणाऱ्या एका व्यक्तीने हे संपूर्ण नाटक फेसबूकवर लाईव्ह केल्याने हा प्रकार समोर आला.

नीलेश रक्शल नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. नीलेश रक्शल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळेविरोधात भारतीय दंड संहितानुसार कलम 504, 505 (2), 124 A, 153 A आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.