Anti Corrupation Pune | पुण्यातील महिला लिपिक 3450 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Anti Corrupation Pune | जिल्हा परिषदत अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणार्‍या महिलेस 3 हजार 450 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corrupation Pune) रंगेहाथ पकडले आहे. महिला लिपिकास अटक करण्यात आली आहे. महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सीमा विद्याधर विपट (47, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प (जिल्हा परिषद अंतर्गत), ता. मुळशी पौड, जि. पुणे) असे लाच घेणार्‍या महिलेचे नाव आहे. त्याच्याबाबत एका 26 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP ACB Rajesh Bansode), अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP ACB Suraj Gurav), अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक श्रीहरी पाटील (Dysp Shreehari Patil) आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. पौड पोलिस ठाण्यात (Paud Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास एसीबीचे अधिकारी करत आहेत.

 

Web Title : Anti Corrupation Pune | Pune female clerk caught taking Rs 3450 in anti-corruption scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार?

Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव्ह?, 4 दिवसांपासून पुण्यात सुरु आहेत उपचार

Kirit Somaiya | दापोलीतील मुरूडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अन् अनिल परब अडचणीत